दर्जेदार उत्पादने – येथे शुद्ध सागवान वापरले जात असल्याने उत्पादनाचा दर्जा श्रेष्ठच आहे. फर्निचर सुंदर असावे शिवाय ते दणकटही असावे हि प्रत्येकाची इच्छा असते ती पूर्ण करण्याची क्षमता येथील उत्पादनात आहे. ऑफिसेस असो वा घर, जेथे म्हणून फर्निचरची गरज भासते तेथे नामाकित कंपन्या वा अधिकारी मंडळी आवर्जून आमच्याकडे खरेदीला येतात. टेबल, खुर्च्या, पलंग, कपाटे, टीपोय असे विविध प्रकार तयार तसेच मागणीप्रमाणे उपलब्ध आहेत. फर्निचर खरेदी करताना कोणाकडे घ्यावे हे ठरवण्य पूर्वी प्रत्यक्ष आमच्या येथे पाहून खात्री करून घ्या. त्यानंतरच निर्णय घ्या येथील खरेदी समाधानकारक ठरते हे नक्की. शासन नियमानुसार महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय कार्यालये / संस्था या केंद्रामधून सिंगल कोटेशन पद्धतीने साहित्य खरेदी करतात. त्यामुळे दहा ठिकाणी चौकशा करणे, कोटेशन्स मागवणे त्यावर मीटिंग घेऊन निर्णय घेणे या गोष्टीतला वेळ वाचतो व पर्यायाने पैश्याचीबचत होते आमच्या येथे वापरल्या जाणाऱ्या सागवानी लाकूड, एम. एस. स्टील इत्यादी च्या कच्या मालामध्ये शुद्धता असते. मागणीप्रमाणे आधुनिक काळाशी सुसंगत असे फर्निचर आमच्या उत्पादन केंद्रामध्ये उपलब्ध होऊ शकते. येथील व्यवहरातून उभा राहिलेला निधी हा माजी सैनिकांच्या कल्याणासाठी उपयोगात आणला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांनाही नकळतपणे देशकार्यामध्ये आपले योगदान देण्याची संधी फक्त आमच्या येथेच मिळते हा मौल्यवान फायदा बाजारातील इतरांकडे मिळत नाही. वाहतूक सुविधा :- केंद्र उत्पादित साहित्याच्या वाहतुकीसाठी केंद्राच्या स्वमालकीचा ट्रक असून ग्राहकांच्या मागणीनुसार किफायतशीर दारात संपूर्ण महाराष्ट्रात साहित्याची वाहतूक केली जाते.
माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र (टीसीपीसी) सातारा.
महाराष्ट्र शासन मान्यताकृत करंजे नाका,
सातारा - ४१५ ००२
फोन - +९१-२१६२-२३१०३४
मोबा. - +९१ ९९७० १६१ १२६
Account Name - Training Cum Production Center Satara
TAN/PAN - AAAAT3767E
Bank : HDFC Bank, Satara
Account No.: 50200073180232
IFSC Code : HDFC0000790