करंजे नाका, सातारा - ४१५ ००२ tcpcsatara1959@gmail.com
Contact On Whats App : +९१ ९९७० १६१ १२६ Image

कार्य

माजी सैनिक प्रशिक्षण केंद्रातून साहित्य खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा निर्णय क्रमांक
भाखंस - २०२४/प्र.क्र. ८२/भाग-III/ उद्योग ४ दिनांक १/१२/२०१६ (सां. क्र. २०१६१२०२१७०८२६९९५१०) आहे.

व्यवस्थापन

माजी सैनिक प्रशिक्षण केंद्र सातारा हे सैनिक कल्याण विभाग (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली चालणारे लघु उद्योग आहे

माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र (टीसीपीसी सातारा) हि संस्था स्थापनेपासूनच उत्कृष्ट कार्य करत आहे सुरवातीस म्हणजे सन १९५९ ते १९७० या कालावधीत विविध उद्योगांचा प्रशिक्षण कार्यक्रम व तदनंतर आजतागायत अव्याहातपणे सागवानी फर्निचर, स्टील फर्निचर, वस्त्र साहित्य उत्पादन करीत आहे. तसेच दर्जेदार वस्त्र साहित्य पण उपलब्ध करून दिले जात आहे. उत्पादित पुरवठा केलेल्या वस्तूंचा दर्जा गुणवत्ता किंमत यांचा ताल मेळ तसेच तसेच आधुनिक काळाशी सुसंगत असे फर्निचर तयार करणे याची हातोटी साधल्याने संपूर्ण महाराष्ट्रात टीसीपीसी सातारा या नावाने हि संस्था कोणत्याही शासकीय अनुदाना शिवाय स्वबळावर उभी असणारी संस्था म्हणून परिचित आहे. त्याचप्रमाणे संस्थेला व्यवसायातून होणाऱ्या वाढाव्याचा विनियोग सैनिक कल्याण विभागाच्या ध्वजदिन निधी द्वारे माजी सैनिक कल्याण उपक्रमास प्रतिवर्षी हातभार लावत आहे. सध्याच्या उपक्रमामध्ये अजून नवनवीन उपक्रमाची भर पडो त्यायोगे देशसेवेची वृद्धी घडो अश्या शुभेच्छा मी संस्थेला देतो.

-----

ले. कर्नल आर. आर. जाधव (नि)
प्रभारी संचालक
सैनिक कल्याण महाराष्ट्रराज्य पुणे
प्रभारी अध्यक्ष टीसीपीसी, सातारा

 

 

माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र, सातारा (टीसीपीसी) ही संस्था, सातारा येथे सन १९५९ पासून कार्यरत आहे. केंद्रामध्ये सर्व प्रकारचे सागवानी फर्निचर, प्लायवूड फर्निचर, स्टील फर्निचर यांचे उत्पादन होते. तसेच विविध प्रकारच्या वस्त्र साहित्याचा पुरवठा केला जातो. केंद्रातील मालाचा दर्जा, गुणवत्ता, चांगल्या प्रकारचा असून किमतीही रास्त आहेत. तसेच त्यामध्ये पारदर्शकता हा महत्वाचा भाग आहे. केंद्रास यशदा मार्फत विशेष प्रमाणपत्र प्राप्त आहे. आजतागायत हे केंद्र शासनाचे कोणतेही अनुदान नसताना स्वबळावर उभे आहे. तसेच धवजदिन निधीच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी उपक्रमास हातभार लावीत आहे. त्याप्रमाणे स्वउन्नत्ती सुद्धा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सैनिकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्याचे भूषण असलेल्या टीसीपीसी या केंद्रात नवनवीन उत्पादने तयार व्हावीत तसेच त्याअनुषंगाने रोजगार, स्वयंरोजगार अशी समाजपयोगी कामे केंद्राच्या माध्यमातून घडावीत व केंद्राचा नावलौकीक अजून सर्वदूर व्हावा अशी शुभकामना व्यक्त करतो व सुयश चिंतितो.

-----

मा. श्री. जितेंद्र डुडी
जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी,सातारा

   

माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र (टीसीपीसी सातारा) या संस्थेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला दर्जेदार साहित्य निर्मिती केंद्र म्हणून सुपरिचित आहे. तथापी अद्यापि काही घटकांना टीसीपीसी सातारा म्हणजे नेमके काय आहे? याची अजूनही स्थानिक तसेच बाहेर गावच्या लोकांना माहिती नाही असे आढळल्याने टीसीपीसीची वेबसाईट बनवण्याचे प्रयोजन होते. सुतार काम, जोडारी, विणकाम, होजिअरी या विभागात प्रशिक्षण देणेचा कार्यक्रम बंद झाल्यानंतर फक्त उत्पादन प्रक्रिया सन १९७० पासून सुरु झाली ती अव्यहतपणे आजतागायत सुरु आहे. सन २००३ पर्यंत फक्त पारंपरिक फर्निचर तयार होत होते. तदनंतर कामाचे स्वरुप बदलून सध्याच्या काळाला आवश्यक असणारे मागणी नुसारचे आधुनिक फर्निचरची निर्मिती करण्यास सुरवात केली आहे त्याचा लाभ अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये, संस्था, कॉलेज, खाजगी ग्राहके ज्यामध्ये वरिष्ठ शासकीय अधिकारी, व्यापारी, प्राध्यापक, वकील इत्यादी समाजातील विविध घटक घेत आहेत. तसेच आज मितिस जवळ जवळ १० ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीमध्ये पूर्ण अधुनिक स्वरूपाचे फर्निचर बनवून देण्यात आले आहे. संस्थेच्या साहित्याचे ग्राहकांना अवलोकन व्हावे या दृष्टीने स्वत्रंत शोरूम उभारणीचे काम चालू आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत छोटी मोठी नूतनीकरणाची कामे चालू आहेत. तसेच मशिनरींचे आधुनिकीकरण (उदा. पेंट भट्टी, स्पॉट वेल्डिंग वगैरे काम चालू असते) करणेप्रस्तावित आहे. संस्थेच्या आवारातील महा सैनिक भवनाद्वारे सैन्यातील, आजी-माजी सैनिकांच्या महाराष्ट्र शासनाच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या विवाहादि कार्यक्रमासाठी सवलतीच्या दरातील सांस्कृतिक भवन कार्यरत आहे. त्याच्या सुद्धा नूतनीकरणाची कामे चालू असून भोजन कक्षाचे आणि व्हीआयपी कक्षाचे काम पूर्ण झाले असून मुख्य कक्षाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

-----

ले. कर्नल सुशिल अ. साबळे (नि)
व्यवस्थापक
माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र (टीसीपीसी सातारा)