करंजे नाका, सातारा - ४१५ ००२ tcpcsatara1959@gmail.com
Contact On Whats App : +९१ ९९७० १६१ १२६ Image

उपक्रम

महासैनिक भवन व मल्टीपर्पज हॉल


साताऱ्यातील महा सैनिक भवन हॉल म्हणजे शहरातील निसर्ग सानिध्यातील एकमेव मल्टीपर्पज हॉल लग्न कार्य, मुंज, सभा, मेळावा, संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, अश्या विविध कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. यामध्ये कार्यक्रम हॉल, किचन, डायनिंग हॉल व सुंदर वनराईने नटलेले लॉन भाड्याने देण्याची व्यवस्था ही समाजांतील सर्व स्तरातील लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये विशेषतः आजी माजी सैनिकांच्या अवलंबितांच्या व राज्य शासनाचे कर्मचारी यांच्या सोहळा समारंभासाठी भाड्याने देण्याची सवलत उपलब्ध आहे. तसेच समाजातील इतर घटकांसाठी सुद्धा किफायतीशीर दरामध्ये उपलब्ध आहे.


संपर्क - सुभेदार सुरेश रा. गडकरी (नि.)
मो. +९१ ६००५९ ८४०३२ / +९१ ९९७०१ ६११२६

दर आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा!

महासैनिक भवन व मल्टीपर्पज हॉल

मुख्य हॉल ७० फूट x ६२ फूट एवढा असून ८०० ते १००० लोकांची बैठक व्यवस्था उपलब्ध असून यामध्ये ३३६ फिक्स्ड खुर्च्या असून ४६४ सुट्या खुर्च्या आहेत. तसेच मागणी प्रमाणे बैठक व्यवस्था हि उपलब्ध करून देण्याची सोया आहे. हॉल मधील स्टेज हे ३५ फूट x २२ फूट एवढे असून लग्न कार्य, समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना वापरण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. स्टेजच्या दोन्ही बाजूस १० x १० फूट आकारमानाच्या वधू - वरांसाठी चेंजिंग रूम आहेत.


डायनिंग हॉल

मुख्य हॉल ला जोडूनच कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांच्या जेवणासाठी प्रशस्त व आकर्षक असा डायनिंग हॉल उपलब्ध आहे. यामध्ये एकाच वेळी २५० लोकांची जेवणाची सोय आहे. या मध्ये जेवण तयार करण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लॉन

महासैनिक भवन व मल्टीपर्पज हॉल मधील लॉन हे सातारा शहरातील एकमेव प्रशस्त व निसर्ग सानिध्यात असणारे एकमेव ग्रीन लॉन आहे. १०० x १०० फूट अश्या ग्रीन लॉन मध्ये २५ x २५ फुटाचे स्टेज उपलब्ध आहे. वाधू - वरांचे फोटो काढण्यासाठी चॅन अशी हिरवळ व नैसर्गिक पार्श्वभूमी लॉन मध्ये आहे. डोळ्यांना रम्य वाटेल असा परिसर फक्त महा सैनिक भवन मध्ये उपलब्ध आहे.

पार्किंग

हॉल मधील पार्किंग व्यवस्था हि प्रशस्त असून जवळ जवळ २०० ते ३०० चारचाकी वाहने उभी राहतील एवढी सोय आहे.

रूम्स / व्हीआयपी रूम्स

वधू-वरांच्या चेंजिग रूम व्यतिरिक्त वधू व वर पक्षास १५ फूट x २५ फूट च्या स्वतंत्र २ रूम्स आहेत. यामध्ये वेगवेगळी लेडीज आणि जेन्टस अशी टॉयलेट्स आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी आलेल्या अतिथी लोकांसाठी १५ फूट x २५ फूट च्या २ स्वतंत्र रूम्स आहेत. यामध्ये टॉयलेट बाथरूम व कमोड ची व्यवस्था आहे. तसेच गरम पाण्यासाठी गिझरची सोया सुद्धा उपलब्ध आहे.

जनरेटर / एअर कुलर

कार्यक्रमाच्यावेळी लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर उपलब्ध आहे. यामुळे कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. तसेच हॉल मध्ये एअर कुलर सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

हनुमान मंदिर

रस्त्यावरील रहदारी टाळण्यासाठी हॉलच्या आवारातच पूजा-अर्चना करणेसाठी हनुमान मंदिर आहे.

महासैनिक भवन मल्टीपर्पज हॉल मध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना निश्चितच आनंद मिळतोच येतील व्यवहारातून उभा राहिलेला निधी हा माजी सैनिकांच्या कल्याणासाठी उपयोगात आणला जातो.

वृक्षारोपण (दिनांक - ४/८/२०२३)