Change Language to English

माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्राच्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

स्थापना आणि प्रस्तावना सातारा येथील माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्राची स्थापना ११ एप्रिल १९५९ रोजी करण्यात आली आहे. या केंद्राचे म्हणजेच टीसीपीसी चे सन १९८७ मध्ये लघुउद्योग केंद्र म्हणून नोंदणीकरण झाले त्यानुसार याचे कामकाज सर्व शासकीय नियमानुसार यशस्वीरीत्या चालते. हे केंद्र महाराष्ट्र राज्य सैनिककल्याण विभाग पुणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली स्वबळावर चालणारे लघुउद्योग केंद्र आहे. कार्य उद्देश आणि राष्ट्रकार्य महाराष्ट्र राज्य सैनिककल्याण विभाग हे माजी सैनिकांचे पुनर्वसन, सुस्थिती, अडीअडचणी सोडवणे तसेच त्यांना आर्थिक साहाय्यकरणे इत्यादी गोष्टीत मदत करते. टीसीपीसी चे प्रशासकीय व वित्तीय नियंत्रण हे सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्याकडे आहे. टीसीपीसी चीआर्थिक पाप्ती हि माजी सैनिकांच्या कल्याणाकरता कार्यरत असणाऱ्या ध्वजदिन निधीमध्ये वर्ग केली जाते. गुणवत्तेची हमी दर्जेदार उत्पादने – येथे शुद्ध सागवान वापरले जात असल्याने उत्पादनाचा दर्जा श्रेष्ठच आहे. फर्निचर सुंदर असावे शिवाय ते दणकटही असावे हि प्रत्येकाची इच्छा असते ती पूर्ण करण्याची क्षमता येथील उत्पादनात आहे. ऑफिसेस असो वा घर, जेथे म्हणून फर्निचरची गरज भासते तेथे नामाकित कंपन्या वा अधिकारी मंडळी आवर्जून आमच्याकडे खरेदीला येतात. टेबल, खुर्च्या, पलंग, कपाटे, टीपोय असे विविध प्रकार तयार तसेच मागणीप्रमाणे उपलब्ध आहेत. फर्निचर खरेदी करताना कोणाकडे घ्यावे हे ठरवण्य पूर्वी प्रत्यक्ष आमच्या येथे पाहून खात्री करून घ्या. त्यानंतरच निर्णय घ्या येथील खरेदी समाधानकारक ठरते हे नक्की.

व्यवस्थापन

माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र हे सातारा जिल्ह्याचे भूषण म्हणून प्रसिद्ध आहे. यामध्ये व्यवस्थापन वर्गाचा मोठा हातभार आहे.

ले. कर्नल आर. आर. जाधव (नि)

प्रभारी संचालक
सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे
प्रभारी अध्यक्ष टीसीपीसी, सातारा

अधिक वाचा

मा. श्री. जितेंद्र डुडी

जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी,
सातारा

अधिक वाचा

ले. कर्नल सुशिल अ. साबळे (नि)

व्यवस्थापक
माजी सैनिक प्रशिक्षण व उत्पादन केंद्र (टीसीपीसी सातारा)

अधिक वाचा

काही नवीन उत्पादने

आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार सुसज्य, सुंदर, टिकाऊ, असे फर्निचर व इंटेरिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध करून देतो.

New
New
New
New
New
New
New
New

टीसीपीसी केंद्राची वैशिष्टे

१. केंद्रात तयार केले जाणारे फर्निचर हे शुद्ध सागवानी लाकूड उच्च दर्जाचे स्टील तसेच प्लायवूड व सनमायका पासून तयार केले जाते त्यामुळे उत्पादनाचा दर्जा श्रेष्ठच असतो.
२. टेबल, खुर्च्या, पलंग, कपाटे, टीपॉय, सोफा सेट्स असे विविध फर्निचर तयार तसेच मागणी प्रमाणे उपलब्ध केले जातात. येथील खेरदीतून निश्चीतच आनंद मिळतो.
४. ग्राहकाच्या मागणी व डिझाईन नूसार इंटेरियर डिझाईन पद्धतीने उत्तम असे फर्निचर तयार करुन दिले जाते.
५. सैन्यातून सेवा निवृत्त होणाऱ्या सैनिकांना विविध व्यवसायात यांत्रिकी प्रशिक्षण देऊन त्यांचे नागरी जीवनात पुनर्वसन करणे. हा आमचा मुळ उद्देश आहे.

व्हीडिओ