उपक्रम

महासैनिक भवन व बहुउद्देशीय हॉल

मुख्य हॉल ७० फूट x ६२ फूट एवढा असून ६०० ते १००० लोकांची बैठक व्यवस्था उपलब्ध असून, यामध्ये ३३६ निश्चित खुर्च्या असून, ४६४ सुट्या खुर्च्या आहेत. तसेच मागणी प्रमाणे बैठक व्यवस्था हि उपलब्ध करून देण्याची सोय आहे. हॉल मधील व्यासपीठ हे ३५ फूट x २२ फूट एवढे असून लग्न कार्य, समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना वापरण्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. व्यासपीठच्या दोन्ही बाजूस १० x १० फूट आकारमानाच्या वधू - वरांसाठी कपडे बदलण्याची खोली आहेत.

डायनिंग हॉल

मुख्य हॉल ला जोडूनच कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांच्या जेवणासाठी प्रशस्त व आकर्षक असा डायनिंग हॉल उपलब्ध आहे. यामध्ये एकाच वेळी २५० लोकांची जेवणाची सोय आहे. २७x४ या मध्ये जेवण तयार करण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लॉन

महासैनिक भवन व बहुउद्देशीय हॉल मधील लॉन हे सातारा शहरातील एकमेव प्रशस्त व निसर्ग सानिध्यात असणारे एकमेव ग्रीन लॉन आहे. १०० x १०० फूट अश्या ग्रीन लॉन मध्ये २५ x २५ फुटाचे व्यासपीठ उपलब्ध आहे. वधू - वरांचे फोटो काढण्यासाठी छान अशी हिरवळ व नैसर्गिक पार्श्वभूमी लॉन मध्ये आहे. डोळ्यांना रम्य वाटेल असा परिसर फक्त महा सैनिक भवन मध्ये उपलब्ध आहे.

पार्किंग

हॉल मधील पार्किंग व्यवस्था हि प्रशस्त असून जवळ जवळ २०० ते ३०० चारचाकी वाहने उभी राहतील एवढी सोय आहे.

खोल्या / व्हीआयपी खोल्या

वधू-वरांच्या कपडे बदलण्याची खोली व्यतिरिक्त वधू व वर पक्षास १५ फूट x २५ फूट च्या स्वतंत्र दोन रूम्स आहेत. यामध्ये वेगवेगळी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी अशी शौचालये आहेत. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी आलेल्या अतिथी लोकांसाठी १५ फूट x २५ फूट च्या दोन स्वतंत्र खोल्या आहेत. यामध्ये शौचालये, स्नानगृहे व कमोड ची व्यवस्था आहे. तसेच गरम पाण्यासाठी गिझरची सोय सुद्धा उपलब्ध आहे.

जनरेटर / एअर कुलर

कार्यक्रमाच्यावेळी लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर उपलब्ध आहे. यामुळे कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही. तसेच हॉल मध्ये एअर कुलर सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

हनुमान मंदिर

रस्त्यावरील रहदारी टाळण्यासाठी हॉलच्या आवारातच पूजा-अर्चना करण्यासाठी हनुमान मंदिर आहे.

कार्य

वृक्षारोपण (दिनांक - ४/८/२०२३)

Video